आर.पी. पटनाईक
रवींद्र प्रसाद पटनायक हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक आहे ज्याने तीन भारतीय भाषांमध्ये (तेलगू, तामिळ आणि कन्नड (सुमारे ३० चित्रपटांचे)) संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या नावावर ७५हून अधिक चित्रपट आहेत.त्यांनी तीन फिल्मफेर पुरस्कार आणि तीन नंदी पुरस्कार जिंकले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला तरीही त्यांची मातृभाषा ओडिया आहे.
पटनायक एक चित्रपट दिग्दर्शक होण्याची इच्छा मनात ठेवून चित्रपट उद्योगात प्रवेश केला पण संगीत दिग्दर्शक म्हणून प्रथमतः सुरुवात केली. सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक तेजा यांनी त्याला पुढे चाल दिली. पटनायक यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले व सन २००८ च्या 'अंदमानाई मॅनसूलो' (?) या चित्रपटास दिग्दर्शित केले.मार्च २०१६ ला, त्यांनी आपल्या पाचवा तेलुगू भाषिक चित्रपट 'तुलसी दलम' पूर्ण केला. त्यांचे बंधू गौतम पटनायक एक दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी केराटम (२०११)पासून आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली.