आर.एस. अग्रवाल
आर. एस. अग्रवाल | |
---|---|
जन्म | आर. एस. अग्रवाल २ जानेवारी १९४६ दिल्ली |
निवासस्थान | पितमपुरा, दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा |
|
ख्याती | गणितावरची पुस्तके |
धर्म | हिंदू |
डॉ. आर. एस. अग्रवाल ( २ जानेवारी १९४६) हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत. त्यांची गणितावरची पुस्तके खूप लोकप्रिय असून या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत. विशेषतः "क्वॉन्टिटेटीव्ह ऍप्टीट्युड" (इंग्रजी: Quantitative Aptitude) हे त्यांचे मोठ्या प्रमाणात विक्री झालेले पुस्तक आहे.[१][२]
आर.एस. अग्रवाल हे सी.बी.एस.ई. शाळांमधील अतिशय लोकप्रिय नाव आहे. भारतातील शालेय गणितातील महत्त्वाची पुस्तकांमध्ये अग्रवाल यांची पुस्तके समाविष्ट केली जातात.[३]
सुरुवातीचे जीवन
अग्रवाल यांचा जन्म २ जानेवारी १९४६ रोजी दिल्लीतील पितमपुरा येथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पीएच.डी. सुद्धा केली आहे.
संदर्भ
- ^ "Amazon.in". www.amazon.in (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Mathematics For Class-10 Secondary School By R S Aggarwal , V Aggarwal For ( 2020-2021) Examination: Buy Mathematics For Class-10 Secondary School By R S Aggarwal , V Aggarwal For ( 2020-2021) Examination by R S Aggarwal, V Aggarwal at Low Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.
- ^ "RS AGGARWAL Solutions for Class 6, 7, 8, 9, 10, 11, 12 MATH - Meritnation". www.meritnation.com. 2022-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.