Jump to content

आर्ली (पक्षी)

आर्ली (इंग्लिश:Large Indian Pratincole, Swallow-plover) हा एक पक्षी आहे.

कुररीसारखा आकार.आखूड पाय.पंख मिटून बसल्यावर ते पंख शेपटीच्या टोकापर्यंत लांब दिसतात.शेपूट खोलवर दुभंगलेले.डोके आणि पाठीचा रंग हिरवा तपकिरी.कांठावर काळ्या काठाची जुगणी.शेपटीच्या वरचा भाग पांढरा.काळ्या शेपटीचे टोक पांढरे.हनुवटी आणि गळा पिवळट तांबूस.छातीचा रंग पोटाकडे तांबूस,नंतर पांढरा.नर-मादी दिसायला सारखे.

वितरण

स्थानिक स्थलांतर करणारे.हिवाळ्यात भारत,तसेच,नेपाल,श्रीलंका,मालदीव,अंदमान आणि निकोबार बेटांत आढळतात.

सिंध,मध्यप्रदेश,दिल्ली,प.बंगाल,आसाम,बांगलादेश,आणि श्रीलंकेत विण.

निवासस्थाने

नदीकाठचे सपाट प्रदेश,झीलानीजवळचे गायकुरणे या भगत हा पक्षी राहतो.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली