आर्याभारत
आर्याभारत हा मराठी कवी मोरोपंत यांनी लिहिलेला ग्रंथ आहे.
साहित्यिक वैशिष्ट्य
इ.स. १७२९ ते इ.स. १७८४ या कालखंडात मोरोपंत रामचंद्र पराडकर नावाचे कवी महाराष्ट्रात होऊन गेले. मराठी भाषेवर त्यांनी नितांत प्रेम केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत आणून मराठी भाषा त्यांनी फुलवली.महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ पन्हाळ गडावर पाध्ये यांचेकडे ते पाणक्याचे काम करीत असत. मोरोपंतांनी लहानपणी भिंतीवर लिहिलेला एक श्लोक पाध्ये यांनी वाचला . मोरोपंतांची हुशारी पाहून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ते मोरोपंतांचे गुरू बनले. मोरोपंतांनी "सीता- रामायण"," हनुमान-रामायण", अशी जवळ जवळ १०८ रामायणे रचली. याशिवाय "मंत्र भागवत ", मंत्ररामायणे, अमृतमंथन ," धृवचरित्र", हरिश्च्चंद्र आख्यान" आशी छोटी छोटी २० आख्याने रचली. त्यांनी एकूण पंचाहत्तर हजार कविता लिहिल्या त्यामध्ये १७१७० आर्यां असलेले "आर्यभारत" नावाचे संपूर्ण महाभारत, 'भागवत' , 'रामायण',' हरिवंश', 'कृष्णविजय',विविध संस्कृत रचना, स्फूट काव्ये यांचा समावेश होतो.त्यांनी आपल्या एकेका काव्यात उपमा, उत्प्रेक्षा, रूपक , अनुप्रास असे जवळ जवळ ३० प्रकारचे अलंकार वापरले आहेत. तसेच वसंततिलका, मालिनी अशी २८ वृत्ते वापरली आहेत. पंत परंपरेतले ते अखेरचे कवी होते. त्यांची भाषा व्याकरणशुद्ध, अलंकारयुक्त, व तेजस्वी होती. आजूबाजूच्या समाजाचे निरीक्षण करून त्याचा उपयोग ते आपल्या काव्यांत करीत असत. त्यामुळे त्यांच्या काव्यातून मराठी संस्कृती जपली गेली.