आर्मांड कॅलिनेस्कु
आर्मांड कॅलिनेस्कु (रोमेनियन: Armand Călinescu; ४ जून १८९३, पितेस्ती - २१ सप्टेंबर १९३९, बुखारेस्ट) हा एक रोमेनियन अर्थतज्ञ, राजकारणी व अल्प काळाकरिता देशाचा पंतप्रधान होता. मार्च १९३९ मध्ये पंतप्रधानपदावर आलेल्या कॅनिनेस्कूची रोमेनियामधील फॅसिस्ट विचारवादी गटाने २१ सप्टेंबर १९३९ रोजी हत्या केली. नाझी जर्मनीचा त्याच्या हत्येस पाठिंबा होता असे मानण्यात येते.