आर्क्टिक
आर्क्टिक हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. आर्क्टिक प्रदेशात आर्क्टिक महासागर तसेच कॅनडा, ग्रीनलॅंड, रशिया, आइसलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अलास्का), नॉर्वे, स्वीडन व फिनलंड ह्या देशांतील काही भागांचा समावेश होतो.