आरती साहा
भारतीय जलतरणपटू Francobollo dedicato a Arati Gupta | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २४, इ.स. १९४० कोलकाता | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट २३, इ.स. १९९४ कोलकाता | ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व |
| ||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
आरती साहा (२४ सप्टेंबर १९४० ते २३ ऑगस्ट १९९४) ह्या एक लांब अंतर पोहणाऱ्या प्रसिद्ध भारतीय महिला आहेत. आरती चार वर्षाची असताना तिने पोहायला सुरुवात केली. तिचे पोहणे सचिन नाग यांनी पाहिले आणि तिची शिफारस केली. इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी त्यांना प्रेरणा दिली.१९५९ मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी पार केली. त्यानंतर त्या असे करणाऱ्या आशियायी खंडातल्या पहिल्या महिला ठरल्या. १९६० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. .[१][२]
सुरुवातीचे जीवन
आरतीचा जन्म कलकत्यातील एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात १९४८ साली झाला. त्यांना दोन मोठ्या बहिणी व एक मोठा भाऊ होता वडिलांचे नाव पंचगोल साहा असे होते. ते भारतीय सैन्यात एक सामान्य कर्मचारी होते.[३]
आरती दोन वर्षाची असताना तिची आई गेली. जेव्हा ती चार वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या काकांकडे नागपूरजवळच्या चामपटाला घाटात जायची. तिथे ती पोहायला शिकली. १९४६मध्ये पाच वर्षे वयाची असताना तिने शैलेंद्र मेमोरियल जलतरण स्पर्धेत ११० यार्ड फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक जिंकले, आणि तेव्हापासून तिच्या पोहण्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली..[४]
कारकीर्द
राज्य,राष्ट्रीय आणि ऑलिम्पिक
१९४६ आणि १९५६ दरम्यान, आरतीने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतला. १९४५ आणि १९५१ च्या दरम्यान तिने पश्चिम बंगालमधील २२ राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या. तिचे मुख्य क्षेत्र १०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक असे होते. १९४८ मध्ये तिने मुंबई येथे आयोजित झालेल्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत भाग घेतला. तिने १०० मीटर फ्रीस्टाईल आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्यपदक, आणि २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकले. १९४९ साली तिने अखिल भारतीय विक्रम केला. १९५१मधील पश्चिम बंगाल राज्याच्या दौऱ्यावर असताना ती १ मिनिट ३७.७ सेकंदांत ब्रेस्ट स्ट्रोक मारून १०० मीटर पोहली व तिने डॉली नझीरचा अखिल भारतीय विक्रम मोडला. त्याच स्पर्धेत तिने १०० मीटर फ्रीस्टाईल, २०० मीटर फ्रीस्टाईल आणि १०० मीटर बॅक स्ट्रोक्समध्ये नवीन राज्यस्तरीय रेकॉर्ड सेट केले. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघटनेचे सदस्य संख्यने सर्वात कमी होते. त्यावेळी तिने भारताच्या डॉली नझीर आणखी आणि दोघींसह भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे तिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक इव्हेंटमध्ये भाग घेतला. हिट्सवर तिने ३ मिनिटे ४०.८ सेकंदांची कमाई केली (म्हणजे काय?). ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर तिने १०० मीटर फ्रीस्टाईलसाठी तिने तिची बहीण भारती साहा हिला गमावले(??).[५][६]
सन्मान
१९९६ साली त्यांच्या निवासस्थानाजवळ आरती साहा यांचा एक भव्य अर्धपुतळा स्थापन करण्यात आला. तेथे 100 मीटर लांबीचे मोठे दिवे लावण्यात आले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "First Indian Woman to Swim Across English Channel - Arati Saha - First Woman from India to Swim English Channel". www.thecolorsofindia.com. 2018-07-05 रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 65 (सहाय्य) - ^ "Arati Saha Biography in Hindi | आरती साहा की जीवनी". Biography Hindi (इंग्रजी भाषेत). 2018-01-06. 2018-07-06 रोजी पाहिले.
- ^ "आरती साहा". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2017-07-13.
- ^ "Arati Saha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-06-15.
- ^ "How a 19-Year-Old Girl From Bengal Became the First Asian Woman to Conquer the English Channel". The Better India (इंग्रजी भाषेत). 2017-02-23. 2018-07-06 रोजी पाहिले.
- ^ "Arati Saha Bio, Stats, and Results". Olympics at Sports-Reference.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-06 रोजी पाहिले.