आरती
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतर ·नारायण | |
कठ | |
वेदांग | |
शिक्षा · छंद | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
महाकाव्य | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे ·सूक्ते | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती आरती.
आरती करण्याच्या पद्धती
गणपतीस आद्यपूजेचा मान आहे, म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम केली जाते. त्यानंतर,कुलदैवताची, त्यापाठोपाठ, देवीची व इष्टदेवतेची आरती म्हणावी अशी परंपरा आहे. पूजेच्या वेळी एकापाठोपाठ किमान 'तीन' आरत्या म्हटल्या जाव्यात अशी पद्धत आहे. अनेकदा लोक त्यापेक्षा जास्त, पण विषम संख्येत आरत्या म्हणतात.
शंखनाद
आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवतात. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधतात. शंख वाजवतांना डोळे मिटून, ‘ऊध्र्व दिशेकडून येणाऱ्या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत’, असा भाव ठेवतात. [ संदर्भ हवा ] शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णतः छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवतात. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या ध्वनीकडे नेतात आणि तिथेच सोडतात. शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करतात.
आरती
भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणतात. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणतात. आरती म्हणतांना शब्दोच्चार योग्य असावा लागतो. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवतात. प्राथमिक अवस्थेतील ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवतात. पुढच्या अवस्थेतील टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करतात. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवतातत. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवतात आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवतात. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ देतात. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळतात. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवतात. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळत नाहीत, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळतात. घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणतात. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करतात. कापूर-आरती ग्रहण करतात. कापूर-आरती ग्रहण करतात, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवतात. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करतात.) देवाला शरणागत भावाने नमस्कार करतात. यानंतर देवाला प्रदक्षिणा घालतात. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणतात. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहातात. नंतर 'आवाहनं न जानामि' प्रार्थना करतात.[१]
आरत्या
आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: आरती हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:आरती येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.
* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?: |
---|
सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः आरती आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा आरती नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:आरती लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. |
* असे का?: |
---|
मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित आरती ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित आरती ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. |
संदर्भ
[१][२][३] Archived 2006-09-01 at the Wayback Machine. [४] विदागारातील आवृत्ती