Jump to content

आय.एफ.एस.सी. कोड

आय.एफ.एस.सी. कोड तथा भारतीय आर्थिक प्रणाली संकेतांक (इंग्लिश : Indian Financial System Code) हा दोन बँकांमधील पैशाच्या देवाणघेवाणीत वापरला जाणारा संकेतांक आहे. बँकेचा एखादा खातेदार दुसऱ्या बँकेतील खातेदाराला पैसे पाठवू इच्छितो तेव्हा कुठल्या बँकेतील खातेदाराला पैसे पाठवायचे हे ओळखण्यासाठी हा कोड दिला जातो.

वापर

आय.एफ.एस.सी. कोडचा वापर देशांतर्गत आर्थिक प्रदानासाठी होतो. राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक वित्तीय प्रदान ( इंग्लिश: National Electronic Funds Transfer) तसेच वास्तव वेळेत ढोबळ हिशोब (इंग्लिश : Real Time Gross Settlement म्हणजेच RTGS ) , त्वरित भरणा सेवा(इंग्लिश : Immediate Payment Service )या तीन प्रणालीमध्ये आय एफ एस सी कोड वापरला जातो . आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रदानासाठी स्विफ्ट कोडचा वापर केला जातो.

स्वरूप

आय एफ एस सी कोड हा ११ अंक आणि अक्षरे मिळून बनतो

पहिली चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवितात. पाचवे अक्षर ० (शून्य - अंकात ) असते. शेवटचे सहा अंक शाखेचा सांकेतिक क्रमांक दर्शवितात.

बाह्य दुवे