आयोवा
आयोवा Iowa | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | दे मॉईन | ||||||||||
मोठे शहर | दे मॉईन | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २६वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३,८१,१५६ किमी² | ||||||||||
- रुंदी | ५०० किमी | ||||||||||
- लांबी | ३२० किमी | ||||||||||
- % पाणी | ०.७१ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३०वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३०,४६,३५५ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | २०.७/किमी² (अमेरिकेत ३५वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४८,०७५ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-IA | ||||||||||
संकेतस्थळ | www.iowa.gov |
आयोवा (इंग्लिश: Iowa) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले आयोवा हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. आयोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३०व्या क्रमांकाचे राज्य आहे.
आयोवाच्या उत्तरेला मिनेसोटा, वायव्येला साउथ डकोटा, पश्चिमेला नेब्रास्का, दक्षिणेला मिसूरी, ईशान्येला विस्कॉन्सिन तर पूर्वेला इलिनॉय ही राज्ये आहेत. दे मॉईन ही आयोवाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
शहरे
- आयोवा सिटी
- एम्स
- काउन्सिल ब्लफ्स
- चार्ल्स सिटी
- डॅव्हेनपोर्ट
- डेटन
- दे मॉईन
- बेट्टेनडॉर्फ
- मेसन सिटी
- वॉटर्लू
- सीडार रॅपिड्स
- सू सिटी
गॅलरी
- दे मॉईन.
- पूर्व आयोवामधील मक्याचे शेत.
- १८८६ साली बांधलेले आयोवा राज्य संसद भवन
- आयोवाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे