Jump to content

आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय, हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी मंत्रालय आहे जे भारत सरकारचा भाग आहे. हे मंत्रालय पर्यायी औषधाच्या क्षेत्रात विकास, शिक्षण आणि संशोधनाची योजना आखण्याचे कार्य करते.[] मंत्रालयाचे अध्यक्ष हे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असतात आणि सध्या पदावर श्रीपाद येस्सो नाईक आहेत.[]

इतिहास

अनेक सलगच्या पंचवार्षिक योजनांमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रांतर्गत वैकल्पिक आणि स्थानिक स्वदेशी औषधांवर लक्ष केंद्रित केले गेले.[] आरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापलेल्या असंख्य समित्या:- भोरे (१९४६), मुदलीयार (१९६१) आणि श्रीवास्तव समिती (१९७५) यांनी भारतातील औषधांच्या पारंपारिक प्रणाली सुधारण्यावर भर दिला. राष्ट्रीय आरोग्य धोरण (१९८३), आरोग्य विज्ञानातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (१९८९) आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण (२००२) यांनी आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ मेडिसिन (आयएसएम)च्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये पोहोचण्यास सक्षम करण्यास सांगितले.[]

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९६१ - १९६६) आयुर्वेदात डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आणि १९७० मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची स्थापना केली गेली, ज्यानंतर सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी १९७३ मध्ये स्थापन झाली. ६व्या (१९८० - १९८५) आणि ७व्या (१९८५ - १९९०) पंचवार्षिक योजनांन मध्ये औषधे विकसित करणे आणि ग्रामीण कौटुंबिक आरोग्यासाठी चिकित्सकांचा उपयोग करणे असे ठरले. ८व्या पंचवार्षिक योजनेत (१९९२ - १९९७) आयुषला मुख्य प्रवाहात आणण्याकडे लक्ष देण्यात आले. अशा प्रकारे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत मार्च १९९५ मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी विभाग सुरू करण्यात आला.[]

९व्या पंचवार्षिक योजनेत (१९९८ - २००२) पाश्चात्य औषधांशी एकात्मता होण्यासाठी याची खात्री करून घेण्यात आली आणि आयुष प्रणालीतील विविध बाबींवर एकट्या पद्धतीने सामना केला आणि मानव संसाधन विकास आणि संरक्षणामध्ये गुंतवणूकी या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले.[] आणि औषधी वनस्पतींची लागवड फार्माकोपिया पूर्ण करण्यासाठी आणि चांगल्या उत्पादन प्रक्रियेची रूपरेषा तयार केली. नोव्हेंबर २००३ मध्ये विभागाचे नाव आयुष असे करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आयुष चिकित्सकांना एकत्रित करण्यासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले.

९ नोव्हेंबर २०१४ रोजी हे स्वतंत्र मंत्रालय बनले. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका नंतर आयुष हेल्थकेअरवर लक्ष केंद्रित करण्यात आले असे निरीक्षकांनी नोंद केली आहे.[]

उपक्रम

आयुष मंत्रालय अनेक आरोग्य सेवा चालविते; प्रामुख्याने ग्रामीण लोकसंख्यांमधे. ५०,०००हून अधिक मुले ‘स्वस्थ मुलांसाठी होमिओपॅथी’ मध्ये दाखल झाली आहेत.[] आयुष बद्दल सामान्य जनजागृती करण्यासाठी आणि प्रत्येक यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी हे वेगवेगळे दिवस पाळत आहेत.[]

आयुष ही आयुष्मान भारत योजनेचा अविभाज्य कणा बनवणार आहे आणि आयुषच्या विविध यंत्रणेला आधुनिक औषधाने एकत्रित करण्यासाठी मंत्रालयाने बराच काळ काम केले आहे.

संदर्भ

  1. ^ a b "About the Ministry". Ministry of AYUSH.
  2. ^ "Meet the Minister". Ministry of AYUSH.
  3. ^ a b Samal, Janmejaya (2015-11-08). "Situational analysis and future directions of AYUSH: An assessment through 5-year plans of India". Journal of Intercultural Ethnopharmacology. 4 (4): 348–354. doi:10.5455/jice.20151101093011. ISSN 2146-8397. PMC 4665030. PMID 26649240.
  4. ^ Rudra, Shalini; Kalra, Aakshi; Kumar, Abhishek; Joe, William (2017-05-04). "Utilization of alternative systems of medicine as health care services in India: Evidence on AYUSH care from NSS 2014". PLoS ONE. 12 (5): e0176916. doi:10.1371/journal.pone.0176916. ISSN 1932-6203. PMC 5417584. PMID 28472197.
  5. ^ "How ghee, turmeric and aloe vera became India's new instruments of soft power". The Washington Post. 29 January 2018. 18 February 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "AYUSH Ministry Writes to Nobel Laureate Against His 'False Propaganda' on Homeopathy". The Wire. 2019-01-23 रोजी पाहिले.
  7. ^ "First Naturopathy day celebrated by Ayush ministry seeking to promote drug-less system of medicine". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-11-19. 2019-01-31 रोजी पाहिले.