आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता | |
---|---|
आयोजक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० |
प्रथम | २००८ आयर्लंड |
शेवटची | २०१९ युएई |
पुढील |
|
स्पर्धा प्रकार | साखळी सामने गट फेरी आणि बादफेरी (२०२२ पासून) |
संघ | १६ |
सद्य विजेता | संयुक्त अरब अमिराती (१ले विजेतेपद) [२०२२ गट अ] |
यशस्वी संघ | आयर्लंड नेदरलँड्स (प्रत्येकी ३ विजेतेपद) |
सर्वाधिक धावा | मोहम्मद शहजाद (८९५) |
सर्वाधिक बळी | मुदस्सर बुखारी (३९) |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ | |
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता (पूर्वी आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता) ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) मान्यतापात्र चालवली जाणारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आहे. ही स्पर्धा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम पात्रता स्पर्धा आहे.
पहिली आवृत्ती २००८ मध्ये फक्त सहा संघांसह आयोजित करण्यात आली होती. २०१० स्पर्धेसाठी आठ संघ आणि २०१२ आणि २०१३ आवृत्त्यांसाठी १६ संघांपर्यंत वाढवण्यात आले, परंतु २०१५ आणि २०१९ आवृत्त्यांसाठी ते पुन्हा १४ पर्यंत कमी करण्यात आले. २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी, आयसीसी ने प्रत्येकी आठ संघांच्या गट अ आणि गट ब अशा दोन स्वतंत्र पात्रता फेऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला
पात्रता स्पर्धेमधून विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांची संख्या स्पर्धेच्या मॉडेलवर आधारित आहे. आयर्लंड आणि नेदरलँड्सने प्रत्येकी तीन वेळा पात्रता स्पर्धा जिंकल्या आहेत. आयर्लंडला प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्याचा आणि प्रत्येक स्पर्धेतून टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा अनोखा गौरव प्राप्त आहे; २०२२ पर्यंत, आयर्लंड पात्रता स्पर्धेमधून विक्रमी सात वेळा विश्वचषकासाठी पात्र ठरले आहे, तर नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान चार वेळा, स्कॉटलंड तीन वेळा आणि हाँगकाँग आणि ओमान दोनदा पात्र ठरले आहेत. आयर्लंड, नेदरलँड्स आणि कॅनडा हे एकमेव संघ आहेत ज्यांनी पात्रता स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत भाग घेतला आहे.
इतिहास
२००८ पात्रता
पहिली ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा २००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२० साठी पात्रता फेरी म्हणून खेळला गेला आणि २ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २००८ दरम्यान स्टोरमोंट, बेलफास्ट, उत्तर आयर्लंड येथे खेळला गेला. अव्वल तीन संघ[१] २००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२०, ट्वेंटी-20 क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळले. सहा प्रतिस्पर्धी संघ होते:
- बर्म्युडा
- कॅनडा
- आयर्लंड
- केन्या
- नेदरलँड्स
- स्कॉटलंड
ही स्पर्धा आयर्लंड आणि नेदरलँड्सने जिंकली होती, पावसामुळे अंतिम सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय सोडून दिला गेला, त्यामुळे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये विभागून देण्यात आले. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये २००९ च्या आयसीसी विश्व ट्वेंटी-२० अंतिम सामान्यासाठी पात्र ठरले. झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर, अंतिम सामन्यातील दोन संघांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडचा संघ पात्र ठरला.
२०१० पात्रता
२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता सामने ९-१२ फेब्रुवारी २०१०[२] दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला गेला. अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स यांनी प्रथमच स्पर्धेत प्रवेश केल्यामुळे त्याचा आठ संघांमध्ये विस्तार करण्यात आला, तर बर्म्युडाने प्रवेश केला नाही.
आठ प्रतिस्पर्धी संघ होते:[३]
- अफगाणिस्तान
- कॅनडा
- आयर्लंड
- केन्या
- नेदरलँड्स
- स्कॉटलंड
- संयुक्त अरब अमिराती
- अमेरिका
चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने अंतिम फेरीत आयर्लंडचा पराभव केला आणि ट्वेंटी२० क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०, वेस्ट इंडीजमध्ये खेळण्यासाठी दोन्ही संघांनी प्रगती केली.
२०१२ पात्रता
२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ च्या सुरुवातीला खेळली गेली. ही एक विस्तारित आवृत्ती होती ज्यामध्ये सहा एकदिवसीय/ट्वेंटी२० दर्जाच्या देशांव्यतिरिक्त प्रादेशिक ट्वेंटी२० स्पर्धेतील दहा पात्र देशांचा समावेश होता. २०१२ विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत एकूण ८१ देशांनी दहा स्थानांसाठी स्पर्धा केली. अंतिम पात्रता स्पर्धेत भाग घेणारे सोळा खालीलप्रमाणे:
- अफगाणिस्तान
- बर्म्युडा
- कॅनडा
- डेन्मार्क
- हाँग काँग
- आयर्लंड
- इटली
- केन्या
- नामिबिया
- नेपाळ
- नेदरलँड्स
- ओमान
- पापुआ न्यू गिनी
- स्कॉटलंड
- युगांडा
- अमेरिका
आयर्लंडने अंतिम फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करून चॅम्पियनशिप जिंकली आणि पुन्हा दोन्ही संघांनी २०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० मध्ये खेळण्यासाठी प्रगती केली.
२०१३ पात्रता
२०१३ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, नोव्हेंबर २०१३ मध्ये खेळली गेली. त्यात आधीच्या मोसमाप्रमाणेच प्रादेशिक ट्वेंटी२० स्पर्धेतील दहा पात्र संघ आणि मागील स्पर्धेतील अव्वल सहा संघांसह १६ संघाचा समावेश होता. आयर्लंड आणि अफगाणिस्तान (त्यांच्या गटात अव्वल स्थान मिळवून), नेपाळ आणि युएई (बाद फेरी सामने जिंकून पहिले उपविजेते) आणि नेदरलँड्स आणि हाँगकाँग (५वे आणि ६वे स्थान) २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०साठी पात्र ठरले. प्रतिस्पर्धी देश खालील प्रमाणे होते:
- अफगाणिस्तान
- बर्म्युडा
- कॅनडा
- डेन्मार्क
- हाँग काँग
- आयर्लंड
- इटली
- केन्या
- नामिबिया
- नेपाळ
- नेदरलँड्स
- पापुआ न्यू गिनी
- स्कॉटलंड
- युगांडा
- संयुक्त अरब अमिराती
- अमेरिका
अव्वल सहा संघ: आयर्लंड, अफगाणिस्तान, नेदरलँड्स आणि ट्वेंटी२० विश्वात पदार्पण करणारे यूएई, नेपाळ आणि हाँगकाँग यांनी २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत प्रवेश केला.
२०१५ पात्रता
२०१५ आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी२० पात्रता स्पर्धा जुलै २०१५ मध्ये खेळवली गेली आणि आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन देशांनी प्रथमच सह-यजमानपद भूषवले. अंतिम आणि तिसऱ्या स्थानासाठीचे दोन्ही प्लेऑफ सामने पावसामुळे रद्द झाले; स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये विजेतेपद विभागून देण्यात आले, तर गट फेरीमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे आयर्लंडच्या संघाला हाँगकाँगपेक्षा वरचे तिसऱ्या स्थान देण्यात आले. आफ्रिका क्रिकेट संघटना आणि आयसीसी अमेरिका प्रादेशिक संस्थांनी प्रत्येकी एक स्थान गमावले आणि आशिया क्रिकेट संघटनेला युरोप क्रिकेट समितीडून एक स्थान मिळाले अशा प्रकारे स्पर्धेतील संघांची एकूण संख्या १४ पर्यंत कमी करण्यात आली:
आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि स्पर्धेत पदार्पण करणारे ओमान हे अव्वल सहा संघ २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० साठी पात्र ठरले.
२०१९ पात्रता
२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता स्पर्धा १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१९ दरम्यान युएईमध्ये खेळवली गेली.
पात्रता स्पर्धेतील नेदरलँड, आयर्लंड, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान आणि पहिल्यांदाच पापुआ न्यू गिनी, हे अव्वल सहा संघ २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या गटात श्रीलंका आणि बांगलादेशसोबत सामील झाले.
२०२२ पात्रता
२०२२ पुरुष टी२० विश्वचषक पात्रता सामने फेब्रुवारी आणि जुलै २०२२ मध्ये अनुक्रमे ओमान आणि झिम्बाब्वे येथे खेळले जातील. या स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती असेल जिथे दोन भिन्न देश स्पर्धा एकत्र परंतु वेगवेगळ्या वेळी आयोजित करतील.
प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
गट अ | गट ब |
---|---|
|
|
अ गटाच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. संयुक्त अरब अमिराती आणि आयर्लंड हे दोन अव्वल संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले.
विजेते
२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग १ स्पर्धेमधून २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७च्या उद्घाटनासाठी दोन सहयोगी संघ केन्या आणि स्कॉटलंड पात्र ठरले.
वर्ष | यजमान | अंतिम सामन्याचे स्थान | अंतिम | |||
---|---|---|---|---|---|---|
विजेते | निकाल | उपविजेते | ||||
२००८ | आयर्लंड | बेलफास्ट | आयर्लंड नेदरलँड्स | सामना रद्द – विजेतेपद विभागून धावफलक | ||
२०१० | संयुक्त अरब अमिराती | दुबई | अफगाणिस्तान १४७/२ (१७.३ षटके) | अफगाणिस्तान ८ गडी राखून विजयी धावफलक | आयर्लंड १४२/८ (२० षटके) | |
२०१२ | संयुक्त अरब अमिराती | दुबई | आयर्लंड १५६/५ (१८.५ षटके) | आयर्लंड ५ गडी राखून विजयी धावफलक | अफगाणिस्तान १५२/७ (२० षटके) | |
२०१३ | संयुक्त अरब अमिराती | अबू धाबी | आयर्लंड २२५/७ (२० षटके) | आयर्लंड ६८ धावांनी विजयी धावफलक | अफगाणिस्तान १५७ (१८.५ षटके) | |
२०१५ | आयर्लंड | डब्लिन | नेदरलँड्स स्कॉटलंड | सामना रद्द – विजेतेपद विभागून धावफलक | ||
२०१९ | संयुक्त अरब अमिराती | दुबई | नेदरलँड्स १३४/३ (१९ षटके) | नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी धावफलक | पापुआ न्यू गिनी १२८/८ (२० षटके) | |
२०२२ | अ | ओमान | मस्कत | संयुक्त अरब अमिराती १६०/३ (१८.४ षटके) | संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी धावफलक | आयर्लंड १५९ (२० षटके) |
ब | झिम्बाब्वे | TBD |
संघानुसार कामगिरी
- सूची
- १ले – विजेते
- २रे – उपविजेते
- ३रे – तिसरे स्थान
- — यजमान
- पुरुष टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ अधोरेखित.
- पा – पात्र
- — – भाग घेतला नाही किंवा पात्र होण्यात अयशस्वी
- § – संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला, परंतु नंतर माघार घेतली किंवा अपात्र ठरला
- × – दुसऱ्या पद्धतीने विश्वचषकासाठी आधीच पात्र झाल्यामुळे भाग घेतला नाही
- • – दुसऱ्या गटात खेळतील (फक्त २०२२ आवृत्ती पहा)
संघ | २००८ (६) | २०१० (८) | २०१२ (१६) | २०१३ (१६) | २०१५ (१४) | २०१९ (१४) | २०२२ (१६) | एकूण | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अ (८) | ब (८) | ||||||||
अफगाणिस्तान | — | १ले | २रे | २रे | ५वे | × | × | ४ | |
बहरैन | — | — | — | — | — | — | ६वे | • | 1 |
बर्म्युडा | ६वे | — | १३वे | १४वे | — | १३वे | — | ४ | |
कॅनडा | ५वे | ८वे | ६वे | १२वे | १४वे | ९वे | ५वे | • | ७ |
डेन्मार्क | — | — | १६वे | १६वे | — | — | — | २ | |
जर्मनी | — | — | — | — | — | — | ७वे | • | १ |
हाँग काँग | — | — | ११वे | ६वे | ४थे | ८वे | • | पा | ५ |
आयर्लंड | १ले | २रे | १ले | १ले | ३रे | ३रे | २रे | • | ७ |
इटली | — | — | १०वे | ९वे | — | — | — | २ | |
जर्सी | — | — | — | — | ११वे | १०वे | • | पा | ३ |
केन्या | ४थे | ५वे | ९वे | ११वे | ९वे | ११वे | — | ६ | |
नामिबिया | — | — | ३रे | १०वे | ७वे | ४थे | × | ४ | |
नेपाळ | — | — | ७वे | ३रे | १२वे | — | ३रे | • | ४ |
नेदरलँड्स | १ले | ४थे | ४थे | ५वे | १ले | १ले | • | पा | ७ |
नायजेरिया | — | — | — | — | — | १४वे | — | १ | |
ओमान | — | — | १५वे | — | ६वे | ६वे | ४थे | • | ४ |
पापुआ न्यू गिनी | — | — | ८वे | ८वे | ८वे | २रे | • | पा | ५ |
फिलिपिन्स | — | — | — | — | — | — | ८वे | • | १ |
स्कॉटलंड | ३रे | ७वे | ५वे | ७वे | १ले | ५वे | × | ६ | |
सिंगापूर | — | — | — | — | — | १२वे | • | पा | २ |
युगांडा | — | — | १४वे | १३वे | — | — | • | पा | 3 |
संयुक्त अरब अमिराती | — | ३रे | — | ४थे | १३वे | ७वे | १ले | • | ५ |
अमेरिका | — | ६वे | १२वे | १५वे | १०वे | — | • | पा | ५ |
झिम्बाब्वे | × | × | × | × | × | § | • | पा | १ |
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://icc-cricket.yahoo.com/media-release/2008/July/media-release20080717-39.html[permanent dead link] आयसीसी क्रिकेट, retrieved १७ जुलै २००८
- ^ "असोसिएट क्रिकेटच्या महत्त्वपूर्ण तारखा". क्रिकइन्फो.कॉम. 2010-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ ऑगस्ट २००९ रोजी पाहिले.
- ^ "UAE to host expanded World Twenty20 Qualifiers". Cricinfo.com. June 27, 2009 रोजी पाहिले.
बाह्यदुवे
- विश्व ट्वेंटी२० पात्रता संकेतस्थळ Archived 2008-08-06 at the Wayback Machine.
- आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ लाइव्ह स्ट्रीमिंग Archived 2019-07-01 at the Wayback Machine.
- आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता २०१६ वेळापत्रक