आयसीडी-१० प्रकरण १ : विशिष्ट संक्रामक व परजीविक आजार
आयसीडी-१० ही व्याधी व संबंधित आरोग्य समस्यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती आहे. व्याधी, लक्षणे व चिन्हे, विकृत बाबी, तक्रारी, सामाजिक परिस्थिती आणि व्याधी वा इजांची बाह्य कारणे या सर्वांसाठी या वर्गीकरणात संकेत आहेत. या पृष्ठावर या वर्गीकरणाचे पहिले प्रकरण दिलेले आहे.
A00–A79 – शाकाणुजन्य संक्रमणे व इतर आंत्रीय संक्रामक विकार आणि संयोग संक्रमी विकार
(A00–A09) आंत्रीय संक्रामक विकार
- (A00) पटकी
- (A01) विषमज्वर आणि पराविषमज्वर
- (A02) अन्य साल्मोनेला संक्रमणे
- (A03) शिगेलारुग्णता
- (A03.0) शिगेला डिसेंट्रियीमुळे झालेला शिगेलारुग्णता
- (A03.1) शिगेला फ्लेक्स्नेरीमुळे झालेला शिगेलारुग्णता
- (A03.2) शिगेला बॉयडीमुळे झालेला शिगेलारुग्णता
- (A03.3) शिगेला सोनीमुळे झालेला शिगेलारुग्णता
- (A03.8) अन्य शिगेलारुग्णता
- (A03.9) शिगेलारुग्णता, अविनिर्दिष्ट
- दंडाणुजन्य आमांश अविन (अन्यथा विनिर्दिष्ट नसलेला)
- (A04) अन्य शाकाणुजन्य आंत्रीय संक्रमणे
- (A04.0) आंत्रविकृतीजन्य इशिरिकिया कोलाय संक्रमण
- (A04.1) आंत्रविषजनक इशिरिकिया कोलाय संक्रमण
- (A04.2) आंत्र-आक्रमी इशिरिकिया कोलाय संक्रमण
- (A04.3) आंत्ररक्तस्रावी इशिरिकिया कोलाय संक्रमण
- (A04.4) अन्य आंत्रीय इशिरिकिया कोलाय संक्रमणे
- (A04.5) कॅंपायलोबॅक्टर आंत्रशोथ
- (A04.6) यर्सिनीया एंटेरोकोलायटिकामुळे झालेला आंत्रशोथ
- (A04.7) क्लॉस्ट्रिडिअम डिफिसाईलमुळे झालेला आंत्रबृहदांत्रशोथ
- छद्मपटलीय बृहदांत्रशोथ
- (A04.8) अन्य विनिर्दिष्ट शाकाणुजन्य आंत्रीय संक्रमणे
- (A04.9) शाकाणुजन्य आंत्रीय संक्रमणे, अविनिर्दिष्ट
- शाकाणुजन्य आंत्रशोथ अविन
- (A05) अन्य शाकाणुजन्य अन्नोद्भूत विषाक्तता
- (A06) अमिबारुग्णता
- (A06.0) तीव्र अमिबाजन्य आमांश
- (A06.1) दीर्घकालिक आंत्रीय अमिबारुग्णता
- (A06.2) अमिबाजन्य अनामांश बृहदांत्रशोथ
- (A06.3) आंत्राचा अमिबोमा
- (A06.4) अमिबाजन्य यकृत विद्रधी
- (A06.5) अमिबाजन्य फुफ्फुस विद्रधी
- (A06.6) अमिबाजन्य मस्तिष्क विद्रधी
- (A06.7) त्वचीय अमिबारुग्णता
- (A06.8) इतर स्थानांमधील अमिबाजन्य संक्रमणे
- (A06.9) अमिबारुग्णता, अविनिर्दिष्ट
- (A07) अन्य प्रोटोझोआजन्य आंत्रीय विकार
- (A08) विषाणुजन्य आणि अन्य विनिर्दिष्ट आंत्रीय संक्रमणे
- (A08.0) रोटाविषाणुजन्य आंत्रशोथ
- (A09) गृहित संक्रमणी उद्भवाचा अतिसार आणि जठरांत्रशोथ
(A15–A19) क्षय
- (A15) श्वसन क्षय, शाकाणूशास्त्रदृष्ट्या आणि ऊतीशास्त्रदृष्ट्या पुष्टीकृत
- (A16) श्वसन क्षय, शाकाणूशास्त्रदृष्ट्या आणि ऊतीशास्त्रदृष्ट्या पुष्टीकृत नसलेला
- (A17) तंत्रिका संस्थेचा क्षय
- (A18) अन्य इंद्रियांचे क्षय
- (A18.0) हाडांचा आणि सांध्यांचा क्षय
- (A18.1) जननमूत्रीय संस्थेचा क्षय
- (A18.2) यक्ष्मीय परिघीय लसीकागाठविकृती
- (A18.3) आंत्र, उदरावरण आणि आंत्रयोजी ग्रंथींचा क्षय
- (A18.4) त्वचा आणि अधस्त्वचीय ऊतीचा क्षय
- गंडमाळ
- (A18.5) डोळ्याचा क्षय
- (A18.6) कानाचा क्षय
- (A18.7) अधिवृक्क ग्रंथींचा क्षय
- (A18.8) अन्य विनिर्दिष्ट इंद्रियांचा क्षय
- (A19) मसुऱ्या क्षय
(A20–A28) विशिष्ट प्राणिप्रसारित शाकाणुजन्य विकार
- (A20) प्लेग
- (A21) तुलारीरोग
- (A22) काळपुळी
- (A23) ब्रुसेला रोग
- (A24) शेंबा आणि मेलिऑइड विकार
- (A25) मूषक-दंश ज्वर
- (A26) अरुणचर्म
- (A27) लेप्टोस्पायरॉसिस
- (A28) अन्य प्राणिप्रसारित शाकाणुजन्य विकार, इतरत्र वर्गीकृत नसलेले
(A30–A49) अन्य शाकाणुजन्य विकार
- (A30) कुष्ठ (हन्सेनचा विकार)
- (A31) अन्य मायकोबॅक्टेरियामुळे होणारी संक्रामणे
- (A31.0) मायकोबॅक्टेरियाचे फुफ्फुसी संक्रमण
- मायकोबॅक्टेरिअम एविअममुळे झालेले संक्रमण
- मायकोबॅक्टेरिअम इन्ट्रासेल्युलारी (बॅटी दंडाणू)मुळे झालेले संक्रमण
- मायकोबॅक्टेरिअम कन्सासीमुळे झालेले संक्रमण
- (A31.1) मायकोबॅक्टेरियाचे त्वचीय संक्रमण
- बुरुली व्रण
- मायकोबॅक्टेरिअम मरिनममुळे झालेले संक्रमण
- मायकोबॅक्टेरिअम अल्सरन्समुळे झालेले संक्रमण
- (A31.8) मायकोबॅक्टेरियाची अन्य संक्रमणे
- (A31.9) मायकोबॅक्टेरियाचे संक्रमण, अविनिर्दिष्ट
- मायकोबॅक्टेरियाची अविशिष्ट संक्रमणे अविन
- मायकोबॅक्टेरिया विकार अविन
- (A31.0) मायकोबॅक्टेरियाचे फुफ्फुसी संक्रमण
- (A32) लिस्टेरिया विकार
- (A33) नवजात अर्भकातील धनुर्वात
- (A34) प्रसूतीशास्त्रीय धनुर्वात
- (A35) अन्य धनुर्वात
- (A36) घटसर्प
- (A37) डांग्या खोकला
- (A38) लोहितांग ज्वर
- (A39) मेनिंगोकॉकसचे संक्रमण
- (A40) स्ट्रेप्टोकॉकसी जंतुरक्तता
- (A41) अन्य जंतुरक्तता
- (A41.0) स्टफिलोकॉकस ऑरिअसमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.1) अन्य विनिर्दिष्ट स्टफिलोकॉकसमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.2) अविनिर्दिष्ट स्टफिलोकॉकसमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.3) हिमोफिलस इन्फ्लुएंझीमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.4) विनॉक्सीश्वसनींमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.5) अन्य ग्रॅम-आग्राही सूक्ष्मजीवांमुळे झालेली जंतुरक्तता
- (A41.8) अन्य विनिर्दिष्ट जंतुरक्तता
- (A41.9) जंतुरक्तता, अविनिर्दिष्ट
- पूती आघात
- (A42) किरणकवकरोग
- (A43) नोकार्डिआ विकार
- (A44) बार्टोनेलामयता
- (A46) परिसर्प
- (A48) अन्य शाकाणुजन्य विकार, इतरत्र वर्गीकृत नसलेले
- (A49) अविनिर्दिष्ट स्थानाचे शाकाणुजन्य संक्रमण