Jump to content

आयव्हन क्लास्निच

आयव्हन क्लास्निच (२९ जानेवारी, १९८०:हांबुर्ग, जर्मनी - ) हा क्रोएशियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २००६ च्या फिफा विश्वचषकात भाग घेतला होता.

२००७मध्ये क्लास्निचला मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घ्यावे लागले व त्यानंतर तो २००८ युएफा युरो स्पर्धेत खेळला.