Jump to content

आयपॉड

आयपॉड

आयपॉड हे मॅकिंतोश हा संगणक आणणाऱ्या ॲपल या कंपनीचे गाणी ऐकण्याचे साधन आहे. याचे विविध प्रकार कंपनीने प्रचलित केले आहेत. जसे,

  • आयपॉड क्लासिक - जास्तीत जास्त गाणी अथवा माहिती साठवता येते सुमारे तोनशेसाठ गिगाबाईट्स
  • आयपॉड शफल - अगदी छोटेसे
  • आयपॉड नॅनो - मध्यम आकार मध्यम साठवण क्षमता
  • आयपॉड टच - आठ आणि सोळा गिगाबाईट्स क्षमतेत मिळतो
  • आयपॉड टच हे ॲपलच्या आयफोनचीच प्रणाली वापरते.

कोणत्याही आयपॉड मध्ये आयट्यून्स या ॲपल निर्मीत प्रणालीद्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते. आयट्युन्स शिवाय ॲमेरॉक, जीनोम लिसन, बानशी, फ्लूला, जीटीकेपॉड, मिडियामंकी, यमीपॉड, रिदमबॉक्स हे सुद्धा इतर आयट्यून्स सारख्याच प्रणाल्या आहेत.

वाय-फाय या प्रणालीद्वारे आयपॉड टच वर सर्फींगपण करता येते आणि इतरही अनेक उपयोग आहेत, जसे नकाशा पाहता येणे, यु ट्युब वरचे व्हिडीयो पाहणे वगैरे वगैरे.

आयपॉड टच वर आयफोनची नवीन २.१ प्रणाली टाकली असता मराठी वाचता येते. यामध्ये मोबाईल सफारी हे बाऊझर युनिकोड रेंडरींग करू शकतो.

मात्र हे युनिकोड रेंडरींग व्यवस्थितपणे येत नाही. चर्चा असेल तर 'च् र्चा ' असे काही तरी दिसते. अजून सुधारणा आवश्यक आहेत.

जेल ब्रेक

आयपॉड जेल ब्रेक म्हणजे काय? ॲपलच्या कोणत्याही उपकरणाची कार्यप्रणाली (ओ एस) ही 'इतर' कोणत्याही प्रकारच्या प्रणालीला अथवा छोट्या उपप्रणाल्यांना येऊ देत नाही, काम करू देत नाही. त्यामुळे ॲपलच्या प्रणालीला जेल म्हंटले जाते. ॲपलने आपली उपकरणे आपल्या कार्यप्रणालीतच कोंडून घातली आहेत. अर्थातच त्याचे कवच तोडून बाहेर पडले की मुक्तपणे काय हवे ते टाकता येते. पण त्या प्रणालीच्या कवच तोडण्याच्या क्रियेला जेलब्रेक असे असे समर्पक नाव दिले गेले आहे.tr

एकदा आयपॉड जेल ब्रेक केले तर त्याची कोणतीही जबाबदारी ॲपल घेत नाही.

बाह्य दुवे