आन्तोना-जिल्बेर सरतियांज
आन्तोना-जिल्बेर सरतियांज (फ्रेंच: Antonin-Gilbert Sertillanges; इ.स. १८६३–इ.स. १९४८) एक फ्रेंच आध्यात्मिक लेखक व कॅथोलिक तत्त्वज्ञ होते. तेराव्या शतकातील थॉमस ॲक्विनास या इटालियन संताच्या विचारांचे सरतियांज यांनी उद्बोधन केले. त्यांच्या १९२१ साली प्रकाशीत झालेल्या “ला व्ही इन्तेलेक्चुएल—सों एस्प्री, से कोन्दिस्यों, से मेतोद” (‘बौद्धिक जीवन—मर्म, कारणे, व पद्धती’) या पुस्तकासाठी सरतियांज नावाजलेले आहेत. याशिवाय अध्यात्म, राजकारण, फ्रेंच संस्कृती, आणि पारंपारिक कुटुंब व्यवस्था अशा इतर अनेक विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे.