Jump to content

आनंद गायकवाड

आनंद गायकवाड
जन्म नाव आनंद बळीराम गायकवाड
जन्म २८ ऑगस्ट, १९६० (1960-08-28) (वय: ६४)
यवतमाळ, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वमराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्यकर्ते
साहित्य प्रकारकविता
प्रसिद्ध साहित्यकृती "आखरीचं तुव्ह्च सडान चीबवीन" (कवितासंग्रह)
वडील बळीराम सीताराम गायकवाड
आई पार्वती बळीराम गायकवाड
पत्नी मालती आनंद गायकवाड
अपत्ये पुत्र: संगर
कन्या: प्रखरा, अक्षरा

आनंद बळीराम गायकवाड ( ऑगस्ट २८ ,इ.स.१९६० - हयात) समाजिक भान असलेले विद्रोही कवी, वैचारिक लेखक, पत्रकार, सामाजिक कार्येकर्ते त्यांचे विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन प्रसिद्ध झाले आहे.आंबेडकरी विचाराचे राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक सजग भान असणारे कार्यकर्ते, कथाकार,ललित लेखक,पथनाट्याची चळवळ राबवणारे नाटककार,अभ्यासू प्रगल्भ वक्ते तसेच विद्रोही कवी अशी त्यांची ओळख आहे.

शिक्षण

आनंद गायकवाड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यवतमाळ येथील नगरपरिषद शाळेत झाले आहे. त्यांनी डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात एम.ए. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथून केले असून सध्या ते डॉ. भाऊ लोखंडे, नागपूर विद्यापीठ यांच्या 'मार्गदर्शनाखाली मराठी कवितेतील "बुद्ध प्रतिमासृष्टी: एक चिकित्सक अभ्यास" यावर पीएच.डी. करत आहेत.रा.तु.म.अमरावती विद्यापीठातून एल.एल.बी. झालेत.

कवितासंग्रह

आनंद गायकवाड यांचा "आखरीचं तुव्ह्च सडान चीबवीन" (कवितासंग्रह इ.स.२०१२) , "इस्तो" (कवितासंग्रह इ.स.२०१२) तसेच "हिंदाण" (कवितासंग्रह, इ.स.२०१२) प्रकाशित झालेले आहेत. "हिंदाण" हा एकल शब्द ओळीतील काव्यसंग्रह आहे, या प्रकारचे लेखन हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे . तसेच आनंद गायकवाड सरांची "आखरीचं तुव्ह्च सडान चीबवीन" (कवितासंग्रह) मधील "रापी" ही कविता इयत्ता ९वीच्या 'कुमारभारती'त समाविष्ट करण्यात आली आहे.

लेखसंग्रह

  • 'चौरस्ता' (लेखंसंग्रह,इ.स.२००३),
  • 'सुरूंग' (एकपात्री प्रयोग,इ.स.२००५ ,)
  • लढाई थांबली कुठे ? .?(दोन अंकी नाटक).
  • हिंदू म्हणून मरणार नाही(लेखसंग्रह.इ.स.२०१०)
  • निळी माणसं(कथासंग्रह, इ.स.२०१२).प्रसिद्ध झाले आहे.

सामाजिक कार्य

राजकीय कार्य

  • उपाध्यक्ष यवतमाळ नगरपरिषद- इ.स.१९९१-९२
  • आरोग्य सभापती, यवतमाळ नगरपरिषद- इ.स.१९९५-९६
  • सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती- इ.स.२००२-२००३
  • आरोग्य सभापती, यवतमाळ नगरपरिषद- इ.स.२००४-०५
  • सदस्य यवतमाळ नगरपरिषद- इ.स.२००६ ते इ.स. २०११
  • डी.एस.फोर. व बहुजन समाज पक्ष यवतमाळ तालुका अध्यक्ष- इ.स.१९८२ ते इ.स.१९९५
  • जिल्हा अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ- इ.स.१९९५ ते २००४(राजीनामा दिला)
    आता आनंद गायकवाड हे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीत.

सांस्कृतिक कार्य

  • सचिव, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी संगटना
  • सचिव,आंबेडकरी साहित्य संमेलन इ.स.१९९७ व इ.स.२००३
  • सचिव,आंबेडकरी युवा साहित्य संमेलन इ.स.२००८
  • सचिव,भारतीय संविधान संमेलन इ.स.२०११
  • श्रमिक साहित्य संमेलन इ.स.२०१२ तसेच फुले- आंबेडकरी स्मृती पर्व(इ.स.२००७), बुद्ध महोत्सव(इ.स.२०१२), अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलन(इ.स.२०१३) यांचे आयोजन व विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात संचालन,आयोजन आनंद गायकवाड यांनी केले आहे.
  • आनंद गायकवाड यांची फेब्रुवारी २०१८ मध्ये उमरखेड (जि.यवतमाळ)येथे संपन्न होणाऱ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे.

प्रसिद्ध काव्यपंक्ती

तो म्हणाला,
तू बरेच दिवसांपासून एकच ड्रेस वापरतो,
मी म्हणालो,
अरे,या नंग्यांच्या दुनियेत एक ड्रेस काय वाईट आहे..?

बाह्यदुवे