आनंद अंतरकर
आनंद अंतरकर (१८ नोव्हेंबर, १९४१ - २८ ऑगस्ट २०२१[१]) हे मराठी लेखक आणि आणि संपादक होते. आपले वडील अनंत अंतरकर यांच्या निधनानंतर ते हंस, मोहिनी, नवल या मासिकांचे संपादक झाले.
आनंद अंतरकरांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. वडिलांना भेटायला येणाऱ्या साहित्यिकांमुळे आनंद अंतरकरांची त्यांच्याशी ओळख राहिली.
लिहिलेली पुस्तके
- घूमर
- झुंजूरवेळ
- एक धारवाडी कहाणी (अनंत अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातल्या काही पत्रव्यवहारांवर आधारित पुस्तक) -संपादित.
- रत्नकीळ
- झुंजूखेळ
- सेपिया (व्यक्तिचित्रणे)
पुरस्कार
- 'एक धारवाडी कहाणी'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार.
- घूमर या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार[२]
- रत्नकीळ या पुस्तकाला मृण्मयी पुरस्कार[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "साक्षेपी संपादक आनंद अंतरकर यांचे निधन". Loksatta. 2022-01-31 रोजी पाहिले.
- ^ "आनंद अंतरकर यांना मसापचा देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार". Loksatta. 2022-01-31 रोजी पाहिले.
- ^ "आनंद अंतरकर यांना मसापचा देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार". Loksatta. 2022-01-31 रोजी पाहिले.