आदिलाबाद
?आदिलाबाद तेलुगू : ఆదిలాబాద్ तेलंगणा • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | २०.७६ चौ. किमी • २६४ मी |
हवामान • वर्षाव तापमान • उन्हाळा • हिवाळा | • १,१३९.९ मिमी (४४.८८ इंच) २५ °C (७७ °F) • १८ °C (६४ °F) • ३३ °C (९१ °F) |
प्रांत | तेलंगणा |
जिल्हा | आदिलाबाद जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,१७,३८८ • ५,६५५/किमी२ |
भाषा | तेलुगू |
संसदीय मतदारसंघ | आदिलाबाद |
विधानसभा मतदारसंघ | आदिलाबाद |
स्थानिक प्रशासकीय संस्था | आदिलाबाद नगरपालिका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड | • 504001 • +०८७३२ • IN-ADB • TS-01 |
संकेतस्थळ: आदिलाबाद नगरपालिका | |
आदिलाबाद (Adilabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आदिलाबाद शहर तेलंगणाच्या उत्तर भागात महाराष्ट्राच्या सीमेजवळ वसले आहे. तेलुगू ही आदिलाबादची मूळ भाषा आहे. आदिलाबाद कापसाच्या समृद्ध लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आदिलाबादला ‘व्हाइट गोल्ड सिटी’ असेही संबोधले जाते. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ३०४ किलोमीटर (१८९ मैल), निजामाबादपासून १५० किलोमीटर (९३ मैल) आणि नागपूरपासून १९६ किलोमीटर (१२२ मैल) अंतरावर आहे. आदिलाबादला "दक्षिण भारताचे प्रवेशद्वार" असेही म्हणतात.
इतिहास
विजापूरचा सुलतान युसुफ आदिल शहा ह्याचे नाव आदिलाबदला देण्यात आले आहे. १९४८ पूर्वी हा भाग हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यानंतर हे भारतामध्ये सामील झाले. आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेपासून ते २०१४ पर्यंत म्हणजेच तेलंगणा राज्याच्या निर्मिती पर्यंत हे शहर आंध्र प्रदेश राज्यामध्ये होते. २०१६ मध्ये पूर्विच्या आदिलाबाद जिल्ह्याला आदिलाबाद, निर्मल, आसिफाबाद, मंचिर्याल या ४ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले.
लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या २६,०४७ कुटुंबांसह १,१७,३८८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ५९,२३२ पुरुष आणि ५८,१५६ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९८१ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील १२,९९३ मुले आहेत, त्यापैकी ६,७२५ मुले आणि ६,२६८ मुली आहेत—हे प्रमाण १,००० प्रति ९३२ आहे. ९७,९४१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ७८.९९ % होता. शहराची नागरी एकत्रित लोकसंख्या १,३९,३८३ आहे, त्यात दसनापूरच्या लोकसंख्येच्या आकड्यांचा समावेश आहे २२,२१६.[१]
५९.३७% लोक हिंदू आणि (३५.५९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (०.८३%), शीख (०.१५%), बौद्ध (२.६०%), जैन (०.१३ %) आणि कोणताही धर्म नसलेले (१.३१ %) यांचा समावेश होतो.[२]
तेलुगू आदिलाबादमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक निकटतेमुळे, मराठी देखील मोठ्या प्रमाणावर बोलली आणि समजली जाते. आदिलाबादमध्ये बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांमध्ये हिंदी, उर्दू आणि गोंडी यांचा समावेश होतो.[३]
भुगोल
आदिलाबादची सरासरी उंची २६४ मीटर आहे.[४] कुंतला धबधबा, गोदावरी, पैनगंगा इत्यादी नद्या जिल्ह्यातून वाहतात.
पर्यटन
कुंतला धबधबा
संस्कृती
प्रशासन
आदिलाबाद नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. १९५६ मध्ये नगरपालिकाची स्थापना करण्यात आली होती. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २०.७६ किमी२ (६.७५ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३६ प्रभाग आहेत. [५]
वाहतूक
राष्ट्रीय महामार्ग ४४ आदिलाबादमधून जातो.[६]
TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चा शहरात बस डेपो आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.
दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) नांदेड रेल्वे विभागाच्या मुदखेड-माजरी विभागात आदिलाबाद येथे रेल्वे स्थानक आहे.[७]
शिक्षण
हे देखाल पहा
संदर्भ
- ^ "adilabad 2011 census" (PDF).
- ^ "Adilabad City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-05 रोजी पाहिले.
- ^ "मातृभाषेनुसार लोकसंख्या - शहर पातळी".
- ^ "Worldwide Elevation Finder". elevation.maplogs.com. 2022-02-05 रोजी पाहिले.
- ^ "Basic Information of Municipality, Adilabad Municipality". adilabadmunicipality.telangana.gov.in. 2022-02-05 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्गांचे तपशील" (PDF).
- ^ "Mudkhed Railway Station News - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-02-05 रोजी पाहिले.