आदित्य सरपोतदार
आदित्य सरपोतदार हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते मराठी चित्रपटसृष्टीचे शिल्पकार नानासाहेब सरपोतदार यांचे पणतू, निर्माते गजानन सरपोतदार यांचे नातू आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्वर्यू अजय सरपोतदार यांचे पुत्र आहेत. आदित्य सरपोतदार वयाच्या १७व्या वर्षी छायाचित्रण करू लागले, त्यांनी काही माहितीपटांची आणि लघुचित्रपटांची निर्मिती केली आणि २००८ साली उलाढाल नावाच्या भव्य मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.
चित्रपट
- उलाढाल (दिग्दर्शन, २००८)
- क्लासमेट्स (दिग्दर्शन, २०१५)
- दम मस्त कलंदर (हिंदी, दिग्दर्शन)
- नारबाची वाडी (दिग्दर्शन, २०१३)
- सतरंगी रे (दिग्दर्शक, २०१२)