Jump to content

आत्मोपनिषद

हे उपनिषद् अथर्ववेदाशी संबंधित आहे. नावाप्रमाणेच ह्या उपनिषदात आत्मतत्त्वाच्या निरनिराळ्या अवस्थांचे – आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा - स्पष्टीकरण केलेले आहे. शरीर आणि इंद्रियांमध्ये सक्रिय असलेल्या चैतन्यास ‘आत्मा’; प्रकृतीचे विविध घटक, पंचतत्त्व इत्यादींमध्ये संव्याप्त असलेल्या अवस्थेस ‘अंतरात्मा’ आणि या सर्व घटकांच्या पलीकडील चेतनाप्रवाहास ‘परमात्मा’ / ‘ब्रह्म’ म्हटलेले आहे. सूर्य जसा राहूग्रस्त दिसतो पण असत नाही त्याप्रकारे आत्मासुद्धा अज्ञानग्रस्त दिसतो पण असत नाही असे सांगून ऋषीने सूर्यग्रहणाच्या तथ्यासोबतच जीवनाच्या तथ्यास प्रकाशित केलेले आहे. दोरीस साप समजणे वगैरेंसारखी उदाहरणे देऊन संसाररूपी भ्रम आणि आत्म्याच्या सहज मुक्तावस्थेचा बोध करून दिलेला आहे. ब्रह्म हे सर्व उपमांच्या, संबोधनांच्या आणि शब्दांच्या पलीकडे आहे हे सिद्ध केलेले आहे.

पहा :