आंतरराष्ट्रीय न्यायालय
संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज | |
शांतता भवन | |
स्थापना | १९४५ |
---|---|
मुख्यालय | हेग, नेदरलँड्स |
अध्यक्ष | जोन डोनोह्यू (अमेरिका) |
संकेतस्थळ | www.icj-cij.org |
आंतरराष्ट्रीय न्यायालय (इंग्लिश: International Court of Justice, फ्रेंच: Cour internationale de justice) हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक अंग आहे. नेदरलॅंड्समधील हेग ह्या शहरात हे न्यायालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर विवाद व तंटे सोडवणे हे ह्या न्यायालयाचे मुख्य कार्य आहे.