Jump to content

अल्टिमेट

अल्टिमेट
150
सर्वोच्च संघटना वर्ड फ्लाईंग डिस्क फेडरेशन
उपनाव अल्टिमेट फ्रिस्बी, फ्लॅटबॉल, फ्रिस्बी
खेळाडू ४९ लाख (२००८ नुसार)[]
माहिती
मिश्र काही प्रतियोगीतांमध्ये
वर्गीकरण बाह्य खेळ
साधन उडती तबकडी
ऑलिंपिक नाही
आता खेळल्याजात नाही हो

अल्टिमेट हा उडत्या तबकडी द्वारे खेळण्यात येणारा सांघिक खेळ आहे. प्रत्येक संघात ७ किंवा कमी खेळाडू असतात. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या अंतिम विभागात तबकडी पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. अंतिम विभाग हा फुटबॉल मधील गोल समान आहे.

खेळाचे स्वरूप

या खेळामध्ये खेळाडूंना तबकडी एका-मेकांकडे फेकून प्रतिस्पर्धी संघाच्या अंतिम विभागात पोहचवून गुण प्राप्त करतात. तबकडी हतात्त असताना खेळाडूंना जागेवरून हलण्याची मुभा नसते. खेळाडू तबकडी घेऊन पळू शकत नाहीत. जर एक संघ तबकडी प्रतिस्पर्धी संघाच्या अंतिम विभागात यशस्वीरित्या पोहचवू शकला तर त्या संघाला एक गुण मिळतो. या नंतर संघ खेळाची दिशा बदलतात व दूसरा संघ तबकडीचा ताबा घेतो. खेळादर्म्यान जर तबकडी खाली पडली अथवा प्रतिस्पर्धी संघाने तबकडी पकडली अथवा तबकडी मैदानाबाहेर गेली, तर प्रतिस्पर्धी संघ तबकडी चा ताबा घेतात व खेळ उलट्या दिशेला चालू करतात.

व्हॅम-ओ कंपनीचा ट्रेड-मार्क असलेली उडती तबकडी

नावाचा इतिहास

या खेळामध्ये आधी कोणतेही पंच नसायचे. त्यामुळे हा खेळ ultimate honor म्हणजेच सर्वोच्च सन्मानाने खेळावा लागायचा. यामुळे या खेळाला अल्टिमेट हे नाव पडले. आधी या खेळाला अल्टिमेट फ्रिस्बी म्हणायचे, परंतु फ्रिस्बी हा व्हॅम-ओ कंपनीचा ट्रेड-मार्क असल्यामुळे या खेळाला काही ठिकाणी डिस्क अल्टिमेट देखील म्हणतात.

संदर्भ

  1. ^ "सी.एन.बी.सी संकेतस्थळावरिल माहिती". ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.