Jump to content

अमरावती एक्सप्रेस

१८०४७/१८०४८ अमरावती एक्सप्रेस (हावडा – वास्को द गामा)-मार्गाचा आराखडा
१७२२५/१७२२६ अमरावती एक्सप्रेस(विजयवाडा – हुबळी)-मार्गाचा आराखडा

भारतीय रेल्वेकडून दोन ठिकाणाहून सेवा दिल्या जाणा-या गाडीला अमरावती एक्स्रपेस असे म्हणतात. डिसेंबर २०१२ रोजी या सेवा खालीलप्रमाणे आहेत.

  • १७२२५ विजयवाडा – हुबळी अमरावती एक्स्रपेस
  • १७२२६ हुबळी – विजयवाडा अमरावती एक्स्रपेस

दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागाकडून कार्यान्वित केली जाणारी ही सेवा आठवडयातून तीनदा वरील मार्गावरून दिली जाते. ही गाडी भारताच्या दक्षिण भागामधून - आंध्र प्रदेशामधून गोव्यापर्यंत जाते.

  • १८०४७ हावडा – वास्को दा गामा अमरावती एक्सप्रेस
  • १८०४८ वास्को द गामा – हावडा अमरावती एक्सप्रेस

ही सेवा आठवडयातून चार वेळा वरील मार्गावरून दिली जाते. विजयवाडा, गुंटाकाळ, हुबळी, मडगांव या मार्गावरून ही गाडी धावते. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरागपूर विभागाकडून ही सेवा कार्यान्वित केली जाते. पश्चिम बंगालमधील ओरीसा आणि भारताच्या पूर्वेकडील आंध्र प्रदेशकडून कर्नाटक आणि दक्षिण - पश्चिमेकडील गोव्यापर्यंत ही गाडी धावते.

आंध्रप्रदेशामधील शहरांमध्ये आणि गुंटुर, नारासरोपेट, कुंम्बुम, गिड्डारुला, नंदयाल, महानंदी, गुंटाकाळ आणि बेलारी आणि आजूबाजूला राहणा-या रहिवाशांमध्ये ही गाडी खुप लोकप्रिय झालेली आहे.

इतिहास

ही गाडी मछलीपट्टणम ते मडगांव या अशी धावते.

ही सेवा १९५० मध्ये प्रथम गुंटुर ते हुबळी दरम्यान सुरू करण्यात आली. १९८७ आणि १९९० च्या सुमारास गुंटुर ते हुबळी दरम्यान असलेली ही प्रवासी सेवा नंतर एक्स्रपेस सेवेमध्ये रूपांतरीत करण्यात आली आणि त्याचे नामकरण अमरावती एक्स्रपेस असे झाले.

या गाडीच्या डब्याला वायपी हे इंजिन जोडलेले आहे आणि वास्को द गामा ते गुंटुर दरम्यान गाडीला शयनयान डबे जोडलेले असतात. गुंटुर येथे जोडलेले शयनयान डबे नंतर गडक येथे गोमंतक एक्सप्रेसला जोडले जातात. हे शयनयान डबे लोंढा येथे मिरज गडग लिंक एक्सप्रेसला जोडले जातात आणि शेवटी गुंटुरला जोडलेले शयनयानाचे डबे गडक येथे हुबळी गुंटुर जलद पॅसेंजरला जोडले जातात. अमरावती एक्स्त्रप्रेस अस्तित्त्वात आल्यानंतर अशा प्रकारे शयनयान जोडण्याचे किंवा जोडलेला शयनयान डबा काढण्याचे काम / पद्धत गडग येथे संपुष्टात आले आणि नवीन थांबा हुबळी येथे झाला. १९९० च्या मध्यापर्यंत नवीन रुळ टाकेपर्यंत वरीलप्रमाणे डबे जोडले आणि तोडले जात होते. १९९७ च्या सुमारास नवीन रुळांचे काम पूर्ण झाले.

१९९४ सुमारास या गाडीची सेवा विजयवाडापर्यंत वाढविण्यात आली. १९९० च्या सुमारास जेव्हा रुळ बांधण्याचे काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले.

२००० च्या सुमारास नवीन रुळ टाकून नवीन मार्ग झाल्यानंतर ही सेवा लोंढा जंक्शन, कास्टल रॉक आणि नंतर वास्को द गामापर्यंत नेण्यात आली. २००० च्या मध्यापर्यंत वास्को द गामा व विजयवाडाच्या दरम्यान दैनंदिन प्रवास करण्यासाठी या गाडीला नेमून देण्यात आले. पण प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यामुळे गाडी आठवडयातून दोनदा सेवा देत असे आणि उर्वरित २ दिवसांसाठी हुबळीपर्यंत गाडी धावत असे.

२००३ च्या सुमारास सेवा तीनदा करण्यात आली. जुलै २००७ पासून वास्को द गामा पर्यंत असलेली सेवा पुढे हावडापर्यंत वाढविण्यात आली.

२०१० मध्ये ७२२७/७२२८ विजयवाडा-हुबळी सेवा १७२२७/१७२२८ या क्रमांकाने आणि ८०४७/८०४८ हावडा-वास्को द गामा सेवा १८०४७/१८०४८ या क्रमांकाने ओळखली जावू लागली.

१२ फेब्रुवारी, २०१३ पासून १७२२५/१७२२६ क्रमांकाच्या हुबळी ते विजयवाडा दरम्यान अमरावती एक्स्रपेसच्या गाडया दररोज धावु लागल्या.

मूळनांव

सातवाहन राजघराण्याची ऐतिहासिक राजधानी अमरावतीवरून या गाडीचे नांव ठेवण्यात आले.सध्या अमरावती गुंटुर जिल्हयामध्ये आहे.

गाडीच्या इंजिनाचा थांबा

हावडा ते गुंटुर - दक्षिण पुर्व रेल्वेच्या डब्ल्यूएपी ४ संत्रगाछी येथे (आयआर कोड : एसआरसी )

गुंटुर ते वास्को द गामा - दक्षिण मध्य रेल्वेच्या डब्ल्यूडीएम३ए घूटी येथे (आयआर कोड :- जीवाय) / घंटाकाळ (आयआर कोड : जीटीएल )

हल्ली घूटीच्या डब्ल्यूडीएम३ए या थांब्याऐवजी डीझेल हुबळीचे डब्ल्यूडीपी४ डीझेल शेड थांब्यासाठी वापरले जाते.

संदर्भ

इतर जोडण्या