अभिजीत कोसंबी
| महागायक डॉ. अभिजीत कोसंबी | |
|---|---|
| आयुष्य | |
| जन्म | २४ जानेवारी १९८२ |
| जन्म स्थान | भारत |
| व्यक्तिगत माहिती | |
| धर्म | बौद्ध |
| नागरिकत्व | भारतीय |
| देश | |
| भाषा | मराठी |
| पारिवारिक माहिती | |
| आई | shailaja kosambi |
| वडील | rajvardhan kosambi |
| अपत्ये | master animesh kosambi |
| संगीत साधना | |
| गायन प्रकार | गायन |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायक |
अभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला.[ संदर्भ हवा ] कोसंबी गझलकार, संगीतकार, गीतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात तसेच भारतभरात त्यांनी विविध कार्यक्रम व स्टेज शो ते करत असतात. सध्या ते कोसंबी म्युझिक अकॅडमी मुंबई येथे "संगीत गुरु" व "संचालक" पदावर कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]
कोसंबी यांचा जन्म 24 जानेवारी 1982 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी, पंडित अरुण कुलकर्णी, रजनी करकरे देशपांडे तसेच भारती वैशंपायन यांच्या कडून संगीताचे धडे घेतले.[ संदर्भ हवा ] कोसंबी यांनी संगीतात कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी केली आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी विषयात देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.[ संदर्भ हवा ]
गाणी
कोसंबी यांनी तन्हाजी या मराठी चित्रपटात 'गीतकार ' म्हणून काम केले. तसेच चाहतो मी तुला, मन वेडावलंय, दर्याचे आम्ही राजे हो, पाऊस हा ही गाणी केली. तसेच संगीतकार आदित्य नाना जाधव यांची गुंतले हृदय व नाजूक परी ही देखील गाणी गायली आहेत.[ संदर्भ हवा ]