अब्बास अली
सय्यद अब्बास अली (जन्म:२० फेब्रुवारी १९७६), इंदूरमधील हा माजी भारतीय प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे. अलीने १९९६-९७ मध्ये क्रिकेट खेळात पदार्पण केले आणि पुढील मोसमात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २५१ धावा केल्या. त्यावेळी हा मध्य प्रदेशातील एक नवीन विक्रम होता, जो दोन वर्षांनंतर जय यादवने एका डावात २६५ धावा करून मोडला . अली इंडियन क्रिकेट लीगमध्ये दिल्ली जायंट्सकडून तसेच आयसीएल इंडिया इलेव्हनकडूनही खेळलेला आहे.