अप्पा मते
| अप्पा मते | |
|---|---|
| जन्म | अप्पा मते आडगाव |
| मृत्यू | ७ जानेवारी २०२० जम्मू काश्मीर |
| मृत्यूचे कारण | हद्ययविकाराचा इटका |
| निवासस्थान | आडगाव, नाशिक |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| पेशा | सैनिक |
| कारकिर्दीचा काळ | ०७ जानेवारी २०२० ला शहीद |
| मूळ गाव | आडगाव नाशिक |
| ख्याती | सैनिक |
| कार्यकाळ | २००६ ते २०२० |
| जोडीदार | मनिषा मते |
| अपत्ये | प्रतिक मते |
| वडील | मधुकर मते |
| आई | म्हाळसाबाई मते |
| शहीद जवान | |
अप्पा मधुकर मते हे भारतीय सेनेतील जनाव होते.
लष्करी जवान आप्पा मधुकर मते हे जम्मू काश्मीरमध्ये निधन झालेले लष्करी जवान आप्पा मधुकर मते [१]यांनआज नाशिकच्या आडगावमध्ये साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह शेफाली भुजबळ यांच्याकडून जवानास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अधूिक माहिती अशी की, श्रीनगरच्या पुढे ७० कि. मी. अंतरावर असलेल्या उंच भागातील एका चौकीवर कार्यरत असतांना ऑक्सीजन कमी पडल्याने आप्पा मते यांना हद्ययविकाराचा इटका आल्याने मंगळवारी (दि.7) राजी रात्री त्यांचा मृत्यु झाला होता.त्यांचे पार्थिव आज नाशिकमध्ये दाखल झाले, त्यांच्या पार्थिवावर आज आडगाव येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्पा मते हे अल्पभूधारक शेतकरीत असुन आई – वडील यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण केले होते. सन 2006 मध्ये ते सैन्यात भरती झाल्यानंतर मागील वर्षात त्यांचा बॉण्ड संपल्यानंतर त्यांनी पुढे चार वर्षाचा बॉण्ड वाढवून घेतला होता. मागील वर्षात सेवानिवृत्त न होता, त्यांनी देशप्रेमातून बॉण्ड वाढवून घेतल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.जम्म काश्मिर मध्ये अलिकडे काही दिवसात बदलेल्या वातावरणामुळे कायम दक्ष असलेल्या सैन्याच्या पथकात ते कार्यरत होते. शेवटी कर्तव्यावर असतांना त्यांचा हद्ययविकाराने मृत्यु झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई म्हाळसाबाई मते, पत्नी मनिषा (वय 30), अकरा वर्षाचा मुलगा प्रतिक, भाऊ भगिरथ असा परिवार आहे.
बाह्य दुवे
- ^ "Video : आडगाव येथील जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; पंचक्रोशीतील जनसागर उसळला | Deshdoot" (इंग्रजी भाषेत). 2020-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-11 रोजी पाहिले.