अटलांटिक महासागर
अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः १०६.४दशलक्ष वर्ग-कि.मी. आहे. ह्या महासागराने पृथ्वीवरील जवळ जवळ एक पंचमांश पृष्ठ व्यापले आहे. 'अटलांटिक' हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. ऍटलासचा सागर तो अटलांटिक. या नावाचा उल्लेख सर्वप्रथम हेरोडोटस संस्कृतीच्या इतिहासात साधारण इ.पू.४५० च्या सुमारास आढळतो.
अटलांटिक महासागर इंग्रजी एस (S) आकारात असून, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैरृत्येला पॅसिफिक महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर, आणि दक्षिणेला दक्षिणी महासागर/ दक्षिणी समुद्र यांना मिळतो. विषुववृत्त या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन भागांमध्ये विभागते.
विस्तार व सीमा
या महासागराच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका, पूर्वेस यूरोप व आफ्रिका आणि दक्षिणेस अंटार्क्टिका ही खंडे आहेत. २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागरांमधील सीमा मानली जाते. उत्तरेचा आर्क्टिक महासागर हा काहींच्या मते अटलांटिकचाच एक उपसमुद्र आहे, तर उत्तरध्रुववृत्त व दक्षिणध्रुववृत्त या काहींच्या मते अटलांटिकच्या उत्तर व दक्षिण सीमा होत. यांच्या दरम्यान अटलांटिकची लांबी सु. १४,४५० किमी. आहे, तर अंटार्क्टिकापर्यंत ती सु. १६,००० किमी. आहे. सामान्यतः विषुववृत्ताच्या उत्तरेचा तो उत्तर अटलांटिक व दक्षिणेचा तो दक्षिण अटलांटिक असे असले तरी वारे, प्रवाह व तपमान यांच्या दृष्टीने दोहोंमधील सीमा ५० उ. अक्षवृत्त ही मानणे अधिक योग्य होय. दक्षिण अटलांटिकच्या मानाने उत्तर अटलांटिकमध्ये बेटे, उपसमुद्र आणि किनारे यांची विविधता अधिक आहे. कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, सेंट लॉरेन्सचे आखात, हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, भूमध्य समुद्र, काळा समुद्र, बाल्टिक समुद्र, बॅरेंट्स समुद्र, नॉर्वेजियन समुद्र हे अटलांटिकचे भाग होत. आर्क्टिक महासागरातून खुल्या अटलांटिकमध्ये बाहेर पडण्याच्या वाटा या सापेक्षतः अरूंद आहेत. हडसनची सामुद्रधुनी सु. १०३ किमी., डेव्हिस सामुद्रधुनी सु. ३२२ किमी., ग्रीनलंड व आइसलॅंड यांमधील डेन्मार्कची सामुद्रधुनी २५५ किमी. आणि आइसलॅंड व उत्तर स्कॉटलंड यांमधील अंतर सु. ८३४ किमी. आहे. दक्षिण अटलांटिकमध्ये मात्र केप हॉर्न व २०० पूर्वरेखावृत्त यांच्या दरम्यानची अंटार्क्टिकाकडील अटलांटिकची फळी सु. ६,३८० किमी. लांब आहे. उत्तर अटलांटिकच्या मानाने येथे समुद्र पुष्कळच थंड व सतत खवळलेला असतो. अटलांटिकचा आकार सामान्यतः इंग्रजी एस् अक्षरासारखा असून लांबीच्या मानाने त्याची रुंदी कमी आहे. न्यू फाउंडलंड ते आयर्लंड येथे त्याची रुंदी सु. ३,३१४ किमी. असून ग्रीनलंड ते नॉर्वे ही रुंदी फक्त १,४९८ किमी. आहे. ब्राझीलचे केप सेंट रॉक ते आफ्रिकेचे केप पामास यांमधील अंतर सु. २,८४७ किमी. आहे. सर्वांत रुंद भाग फ्लॉरिडा व स्पेन यांमध्ये सु. ६,७०० किमी. व मेक्सिकोचे आखात धरून सु. ८,००० किमी. आहे. केप हॉर्न आणि दक्षिण शेटलंड बेटे यांमधील ड्रेक पॅसेज ही पॅसिफिकला जोडणारी सामुद्रधुनी सु. ८७१ किमी. रुंद आहे व रशियाचे अगदी पूर्वेकडील केप डेझनेव्ह आणि अमेरिकेचे अलास्कामधील अगदी पश्चिमेकडील केप प्रिन्स ऑफ वेल्स यांमधील बेरिंग सामुद्रधुनी फक्त सु. ९३ किमी. रुंद आहे. अटलांटिकमध्ये पाणी वाहून आणणाऱ्या प्रदेशाचे क्षेत्रफळ सु. ४३ कोटी २३ लक्ष चौ. किमी., पॅसिफिकच्या किंवा हिंदी महासागराच्या अशा क्षेत्राच्या चौपट आहे. जगातील बऱ्याच मोठमोठ्या नद्या याच महासागराला मिळतात. याचा पूर्व किनारा सु. ५१,५०० किमी. व पश्चिम किनारा सु. ८८,५०० किमी. आहे.
प्रमुख उपसमुद्र
|
|
|
|
उत्तर अटलांटिकपेक्षा दक्षिण अटलांटिक मोठा असून त्यात उपसमुद्र नाहीत. बेटे थोडी आहेत. सेंट पॉल रॉक्स, फर्नॅंदो नरोन्या, असेन्शन, सेंट हेलीना, त्रिनिदाद, मार्टिन व्हास, ट्रिस्टन द कुना, गॉफ् व बूव्हे सुद्धा सागरी बेटे असून फरनॅंदो पो, साऊं टोमे, प्रिन्सिपे, आन्नबॉं, फॉकलंड, साउथ जॉर्जिया, साउथ सॅंडविच व साउथ ऑर्कनी ही खंडांशी संबद्ध आहेत. उत्तर अटलांटिकचे किनारे अधिक दंतुर व जटिल रचनेचे असून त्यांतील बेटे मोठी व पुष्कळ आहेत. फ्रान्झ जोझेफ, स्पिट्स्बर्गेन, बेअर आयलंड, यान मायेन, आइसलॅंड, फेअरो, अझोर्स, मादीरा, कानेरी, केप व्हर्द, न्यू फाउंडलंड, ब्रिटिश बेटे, वेस्ट इंडीज व बहामा ही त्यांतील काही बेटे आहेत. बर्म्यूडा ही जगातील सर्वांत अधिक उत्तरेकडील प्रवाळद्वीपे होत. ग्रीनलंड हा या संदर्भात उत्तर अमेरिकेचा भाग समजला जातो. अंटार्क्टिकाच्या भोवतीचे तिन्ही महासागरांचे पाणी सारख्याच वैशिष्ट्यांचे असल्यामुळे ४०० द. च्या दक्षिणेचा अटलांटिकचा भाग दक्षिण महासागरात धरतात. किनाऱ्यांचा समांतरपणा, लांबट आकार, मध्यवर्ती डोंगराची रांग इ. गोष्टींवरून ðव्हेगेनरने आपल्या खंडविप्लव परिकल्पनेत अमेरिका खंड पश्चिमेकडे वाहत जाऊन हा महासागर इतरांपेक्षा कालदृष्ट्या अलीकडे तयार झाला असावा असे मत मांडले.
तळरचना
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोप ते अमेरिका समुद्री तार टाकण्याच्या निमित्ताने अटलांटिकच्या तळरचनेचा अभ्यास सुरू झाला. त्यामुळेच त्या भागातील अटलांटिकच्या तळावरील सु. २,७५० ते ३,००० मी. खोलीवरील पठारी भागाला टेलिग्राफ पठार असे नाव पडले
भोवतालचे देश
युरोप
सुरुवातीला जरी टेलिग्राफ पठाराप्रमाणेच बहुतेक सर्वत्र अटलांटिकचा तळ बराचसा सपाट असावा असे वाटले, तरी लवकरच अटलांटिकच्या मध्यावर दक्षिणोत्तर गेलेली एक सागरी डोंगरांची रांग आहे हे समजून आले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस अंटार्क्टिक व आर्क्टिक विषयक झालेल्या संशोधनामुळे अटलांटिकच्या त्या बाजूंची काही माहिती उपलब्ध झाली. १९२५ नंतर नवीन शोधांमुळे लक्षावधी ठिकाणी खोली मोजून तळरचनेविषयी अचूक माहिती मिळू लागली. किनाऱ्याजवळील सु. ४,००० मी. खोलीपर्यंतच्या भागाची पाहणी झाली, तरी आर्क्टिक व दक्षिण अटलांटिकमधील मोठमोठ्या क्षेत्रांची पाहणी मात्र नीटशी होऊ शकली नाही.
आफ्रिका
- अँगोला
- बेनिन
- साचा:देश माहिती BVT
- कामेरून
- केप व्हर्दे
- काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
- इक्वेटोरीयल गिनी
- गॅबन
- गांबिया
- घाना
- गिनी
- गिनी-बिसाउ
- कोत द'ईवोआर
- लायबेरिया
- मॉरिटानिया
- मोरोक्को
- नामिबिया
- नायजेरिया
- काँगोचे प्रजासत्ताक
- सेंट हेलेना
- साओ टोमे व प्रिन्सिप
- सेनेगाल
- सियेरा लिओन
- दक्षिण आफ्रिका
- स्पेन (कॅनरी द्वीपसमूह)
- टोगो
- पश्चिम सहारा
अटलांटिकच्या जवळजवळ मध्यावर आइसलॅंडपासून बूव्हे बेटांपर्यंत गेलेली अटलांटिक रिज् ही सागरी डोंगरांची दक्षिणोत्तर रांग सु. ३,००० मी. खोलीवर बहुतेककरून सलग आहे. तिची रुंदी काही ठिकाणी ८०० किमी, पर्यंत आहे. अझोर्स, सेंट पॉल रॉक्स, असेन्शन, ट्रिस्टन द कुना व बूव्हे बेट हे रांगेचे पाण्याबाहेर असलेले भाग होत. विषुववृत्ताच्या थोडे उत्तरेस सु. ४,५०० मी. खोलीवर या रांगेचा रोमान्शे फरो नावाचा खोलगट भाग सागरविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ३७० द. अक्षवृत्तावरील ट्रिस्टन द कुनापासून आफ्रिकेकडे २०० द. अक्षवृत्तापर्यंत सु. ३,००० मी. खोलीवर वॉलफिश रिज् ही एक सागरी डोगरांची रांग गेलेली आहे. तिच्यामुळे अटलांटिक रिज्च्या पूर्वेकडील खोलगट भागाचे दोनभाग झाले आहेत. ३०० द. ते ३५० द. भागात अटलांटिक रिज्पासून दक्षिण अमेरिकेपर्यंत गेलेली ‘रीओ ग्रॅंड रिज्’ सु. ४,००० मी. पेक्षा अधिक खोलीवर सलग आहे. अटलांटिक रिज्च्या दोन्ही बाजूंस सु. ४,००० ते ५,००० मी. खोलीचे अनेक खोलगट भाग आहेत. ग्रीनलंडपासून दक्षिणेस अझोर्स व बर्म्यूडा यांचे दरम्यान लहान दऱ्याखोरी आढळली आहेत. मिसिसिपीसारखी नदी व तिच्या उपनद्या यांची ही खोरी असावीत व त्यांवर समुद्राचे आक्रमण झाले असावे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. प्वेर्त रीकोच्या उत्तरेस सु. ९,२१९ मी. इतकी खोली आढळली असून ही या महासागराची सर्वांत जास्त खोली होय. दक्षिण सॅंडविच बेटांजवळ सु. ८,२६३ मी. खोली आढळून आली आहे. ग्रीनलंड ते स्कॉटलंडपर्यंत गेलेल्या सागरी डोंगररांगेने उत्तरध्रुवीय व नॉर्वेजियन खोलगट भाग खुल्या अटलांटिकपासून वेगळे केलेले आहेत. या रांगेवरच आइसलॅंड व फेअरो बेटे आहेत. ग्रीनलंड व आइसलॅंड यांमधील डेन्मार्कची सामुद्रधुनी व फेअरो ते स्कॉटलंडमधील टॉम्सन वायव्हिल डोंगररांग या ठिकाणी खोली ५०० मी. पेक्षा कमीच आहे. १९३७-३८ नंतर आर्क्टिकची खोली बऱ्याच ठिकाणी मोजण्यात आली. ‘लोमानीसॉव्ह रिज्’ ने या दीर्घवर्तुळाकार ध्रुवीय खोलगट विभागाचे दोन भाग झाले आहेत. या रांगेचा माथा सु. १,५०० मी. खोलीवर आहे. अलास्काच्या बाजूच्या मोठ्या भागाची खोली ४,००० मी.पर्यंत व दुसऱ्या भागाची सु. ५,००० मी. आहे. मोठ्या भागात सागरी डोंगराचे दोन फाटे असून ‘लोमानीसॉव्ह रिज्’ ला समांतर आणखी एक रिज् असावी असे दिसते. ग्रीनलंड-स्पिट्स्बर्गेन रांगेचा माथा १,५०० मी. खोलीवर आहे. नॉर्वेजियन खोलगट भागाची सरासरी खोली सु. ३,६५० मी. आहे.
दक्षिण अमेरिका
कॅरिबियन
- अँग्विला
- अँटिगा आणि बार्बुडा
- अरूबा
- बहामास
- बार्बाडोस
- ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
- केमन द्वीपसमूह
- क्युबा
- कुरसावो
- डॉमिनिका
- डॉमिनिकन प्रजासत्ताक
- फ्रान्स (ग्वादेलोप व मार्टिनिक)
- ग्रेनेडा
- हैती
- जमैका
- माँटसेराट
- नेदरलँड्स (कॅरिबियन नेदरलँड्स)
- पोर्तो रिको
- सेंट बार्थेलेमी
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट लुसिया
- सिंट मार्टेन
- सेंट मार्टिन
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
- टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
- यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह